शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ७

क्षमस्व!!! भाग ६ मध्ये मी संध्याकाळी मॉल मध्ये गेल्याचा उल्लेख केला आहे.... ते आम्ही संध्याकाळी नाही तर दुसय्रा दिवशी गेलेलो.... त्या दिवशी संध्याकाळी आम्ही "मिनी सियाम" ला जाणार होतो..... मिनी सियाम मध्ये जगातल्या महत्त्वाच्या इमारतींच्या लहान स्वरुपातल्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत....पिसा चा मनोरा, पिरॅमिड, लंडन चा ब्रिज, ओपेरा हाऊस अशा लहान प्रतिकृती तिकडे बनवल्या आहेत.... आम्ही साधारण ६ वाजता तिकडे पोहोचलो.... प ने सांगायला सुरुवात केली..... आपण बरोबर ७ वाजत इथेच जमणार आहोत.... आम्ही ओके म्हणालो.... आणि आत गेलो..... आत प्रत्येकच प्रतिकृती इतकी सुंदर बनवली होती कि पाहता पाहता ६.४५ केव्हा वाजले कळलंच नाही. जवळजवळ अर्धा भाग राहीला होता.....इथे पन आम्ही फसलो होतो... इतकी चांगली जागा ह्यांच्या वेळेसाठी अर्धवट पाहावी लागत होती... वेळेत पोहोचायचं म्हणून उरलेला भाग भरभर पाहून बाहेर आलो.... ७.१५ झाले होते.....टाळ्या वाजवण्याचा प्रकार आता रोजचा झाला होता.... आम्ही ६ जण वगळता सगळे आईतखाऊ होते हे आम्हाला कळून चुकलं होतं पण तरी आम्ही बोलून घेतलं की ह्या ठिकाणी फिरायला किती वेळ लागेल हे आम्हाला आधीपासून कसं माहीत असणार??? तुम्ही जास्त वेळ द्यायला हवा होता....
इथून आम्ही जेवायला जाणार होतो.... आम्ही १५ मिनिटे उशीरा आल्याने आम्हाला जेवायच्या ठिकाणी पोहोचायला ८.३० झाले... तरी प चं म्हणणं होतं की ९ ला जेवण व्हायला हवं...
पत्तया मधलं नाइट लाईफ प्रसिद्ध आहे... आज आमची पत्तया मधली शेवटची रात्र होती .... म्हणून आज आम्ही सगळे नाईट लाइफ अनुभवायला जाणार होतो....९.३० पर्यंत जेवणाची वेळ ठरली... मग प ने बोलायला सुरुवात केली.... ति फार उत्साहाने बोलायला लागली की तिचा बार फुसका निघतो हे आम्हाला कळलं होतं.... मग ह्या बार वर आम्हालाच दारू टाकावी लागते तरच तो उडतो..... हे सवयीचं झालं होतं....
प म्हणाली "यु नो पत्तया इज फेमस फॉर इटस नाईट लाईफ..... एंड आय नो यु वॉंट टु एन्जॉय दॅट....राSSSSSSSSSईट???????? "
इतर सगळेः येSSSSSSSSSSस
क्षणात असा फील आला की .... आम्ही शाळेच्या बाकवर बसलोय आणि बाईंनी विचारलं "टिळकांनी शेंगा खाल्या होत्या का???" मुले म्हणाली "नाSSSSSSSSSSSSSSSSही"
पः "ओके ... सो आफ्टर डिनर वुइ विल गो टू """"वॉकर्स स्ट्रीट"""" यु वुइल एन्जॉय देअर....... बस वुइल बी हिअर ओन्ली..... वुइ वुइल कम बॅक बाय १०.३० ओकेSSSSSSSSS"
सगळे खुष.... आम्ही विचार करत होतो... ९.३० ला जेवण संपणार... बस इकडेच... म्हणजे चालत जायचं... जायला १० मिनिटे यायला १० मिनिटे म्हणजे ४० मिनिटे वॉकर्स स्ट्रीट वर.... काहीच उपयोग नाही.... कारण नाईट लाईफ काही ७ ते १० नसतं.... ते १० ला सुरू होतं.... आणि मध्यरात्रीपर्यंत चालतं... आम्ही परत सगळे विरोधी पक्षात उभे राहीलो....
स्वप्नील ने हाच पॉइंट प ला सांगीतला..... तर म्हणे... ओके.... वुइ वुइल मेक इट ११ .... हॅप्पी????? आणि स्वप्नील चक्क नाही म्हणाला..... (हाSहाSहाSहा आम्हाला एकदम हसू यायला लागलं.... तो असा पटकन नाही म्हणेल अस प ला वाटलंच नव्हतं....ती पांढरी पडली.....)
स्वप्नीलः सी नाईट लाईफ स्टार्टस at १०/१०.३० सो वुइ वुइल हार्डली गेट सम टाईम टु एन्जॉय..... and टु एन्जॉय इट ट्रुली वुइ शुड बी देअर ऍटलीस्ट फॉर २ अवर्स...मिनिमम टिल १२ इन द नाईट....
पः नो नो.... वुइ कान्ट...
स्वप्नीलः देन ओके..... यु कॅन मुव्ह अहेड..... वुइ विल मॅनेज ऑन अवर ओन....
पः ओके.... वुइ वुइल मेक इट ११. अंद वुइ वुल वेट फॉर यु टिल ११.१५ इफ यु डोंट कम वुइ वुइल लीव्ह...
आम्हीः ओके....
इथे सगळ्यांनाच धक्का बसला..... सगळ्यांना वाटलं होतं की आता पण आपलं न बोलता काम होइल.... उशीरापर्यंत फिरायला मिळेल..... पण सगळं वेगळंच झालं..... आम्ही ६ जण जेवायला पण थांबलो नाही..... बाहेर गेलो.... खुप भटकलो..... पण प तिचा शब्द पाळते का हे पहायला आम्ही बरोब्बर ११.१० ला बस जवळ आलो. तर तिकडे कुणीच नव्हते.... स्कुलबस वेळेआधीच सुटली होती ...आणि हे प ला उद्या ऐकायला लागणार होतं.... आम्ही परत फिरायला गेलो....वॉकर्स स्ट्रीट वरून अस ४० मिनिटात परत आलो असतो तर केवढ्या मजेला मुकलो असतो हे आम्हाला माहीत झालं होतं.....
आम्ही रात्री १२ ला शेअर रिक्षा मिळवली.... आणि १२.४५ ला पोहोचलो.... पत्तया ला फिरायला येउन पण आमचं हॉटेल जॉम्टीअन नावाच्या गावात/ जागी होतं... म्हणून हा सगळा प्रत्येक ठिकाणी जायला यायला १-१ तासाचा वेळ जात होता..... स्वस्तात मिळालं असावं कारण ३/५ स्टार हॉटेल मध्ये असतात तशा अनेक गोष्टी नव्हत्या तिथे.....हे क्ष कंपनीवाले सतत पत्तया ला टुर ला येणाय्रा लोकांना त्याच हॉटेल मध्ये नेत असणार म्हणजे आणखी स्वस्तात रुम्स मिळत असणार ह्यांना..... मिनी बार, कॉफी मेकर असं सगळं जे ३ ऑर ५ स्टार हॉटेल मध्ये प्रत्येक रुम मध्ये असत ते सगळं आमच्या कुणाच्या रुम मध्ये नव्हतं... म्हणजे ३/५ स्टार मधल्या काही सोयी काढून घेउन कमी पैशात हे हॉटेल मिळवलेलं असावं.... रोज रुम मध्ये पाणी पण दोनच बाटल्या मिळत.....आम्ही वापरो अथवा न वापरो.... पण ज्या सोयी असतात त्या द्यायलाच हव्या होत्या....
असो....
आम्ही हॉटेल मध्ये पोहोचलो तर हॉटेल च्या कँपस मध्ये फिरणारी इतर कपल्स आम्हाला पाहत होती..... बहुदा आपणही ह्यांच्यासारखं करू शकलो असतो तर किती बर झालं असत असा विचार करत असावित.....
पुढच्या भागात....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: