शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ८

दुसय्रा दिवशी आम्ही बँकॉक ला जाणार होतो..... त्या आधी मॉल ला जायचं होतो....आम्हाला खरेदी साठी एका मॉल मध्ये सोडलं खरेदी साठी.... तिकडे सगळं स्वस्त आहे असं प चं म्हणण होतं..... आणि आम्ही कोरल आयलंड ला ज्या वस्तू घेतल्या होत्या त्याहून ३ पट जास्त किमती होत्या.... परत मॉल ... म्हणजे काहीही बारगेन करता येणार नाही.... तरीही इतर लोकांनी काही वस्तू घेतल्या होत्या...आमचे अंदाज बरोबर होते आणि आम्ही आधीच काही वस्तू घेतल्या होत्या.... ह्या मॉल मधली सकाळ फुकट होती.....
दुपारपर्यंत आम्ही बँकॉक ला पोहोचलो.... नशीबाने हॉटेल तसं सिटी मध्ये होत.... ह्यांनी हॉटेल वर सोडलं तर तिकडेच बसून रहावं लागेल असी सिचुएशन नव्हती..... आम्ही दोघे दोघेच फिरू शकत होतो.... त्या दिवशी आम्ही संध्याकाळी रिव्हर क्रुझ वर जाणार होतो. बँकॉक ला मुंबई सारख ट्रॅफिक असतं.... अडकलो कि अडकलो.... त्या दिवशी तसंच झालं आम्ही ६ ला निघालो ७.३० ला क्रुझ निघणार होतं ..... आणि जवळ जवळ १/२ तास ट्रॅफिक मध्ये अडकलो..... अशी सिचुएशन होती कि आता पोहोचणारच नाही.... फी ला खुप टेन्शन आले..... त्याने सगळ्यांना विचारले...की आपण ट्रेन ने जायच का? नशीबाने जिथे आमची बस अडकली होती तिकडे रस्ता क्रॉस केल्यावरच रेलवे स्टेशन होतं..... आम्ही सगळे धावतच भुयारी मार्गात शिरलो..... आणि रस्ता क्रॉस केला..... तिकडे २च तिकिट खिडक्या होत्या....आणी त्यातल्या एकातच एक माणुस बसला होता... आम्हाला हुआ लॅम्फाँग स्टेशन ची तिकिटे काढायची होती....त्या माणसाला इंग्रजी कळत नव्हतं.... आणि तिकिटे मिळणाय्रा मशीन वर सुद्धा थाइ भाषेत सगळं लिहिलेलं असण्याने आम्हाला फी येइपर्यंत थांबावं लागणार होतं.... फी आला... त्याने तिकिटे काढली आणि आम्हाला सोबत घेउन तो प्लॅटफॉर्म वर उभा राहीला... ति ट्रेन हा एक सुखद अनुभव होता..... काठोकाठ भरलेला पाण्याचा ग्लास हातात घेउन उभे राहिलो तरी त्यातून एकही थेंब सांडणार नाही इतकी सॉफ्टली .... आणि स्वप्नील च्या भाषेत "मख्खन" मुव्हमेंट होती तिची..... आणि वेग तर विचारण्याचीच सोय नाही इतका जास्त होता....
आम्ही हुआ लॅम्फाँग स्टेशन ला पोहोचलो..... थायलंड मधल्या रिक्षांना सुद्धा टुकटुक म्हणतात.... (नक्की टुकटुक कि तुकतुक हे शोधायला हव कारण फी तुकतुक म्हणायचा..... आम्हाला तो इंग्रजी बोलताना त्याचे उच्चार ऐकून असे वाटले कि हा ज्याला तुकतुक म्हणतोय ते टुकटुक असावं)आम्ही त्या रिक्षात बसलो आणि पोहोचलो इच्छित स्थळी.....
थायलंड मध्ये जरी लोकशाही आली असली तरी आजही राजाचा निर्णय हा अंतीम निर्णय असतो.... लोक रस्त्यात जरी राजाचा फोटो दिसला तरी लोक नमस्कार करतात इतकी श्रद्धा आहे त्यांची राजावर.... राजा आणि राणी चे फोटो कोरीव महिरपिंमध्ये जागोजागी लावलेले असतात.... तिकडचे लोक "रामा"ला खुप मानतात... तिकडे जशी बुद्धाची देवळे आहेत तशी राम सीतेची पण आहेत....( आम्हाला एकही दाखवले नाही हा भाग वेगळा... नाहीतर आपल्याकडचे देउळ आणि तिकडचे देउळ ह्यातला फरकही मी नमुद केला असता....)तिकडचा राजा म्हणजे रामाचा अवतार असे तिकडचे लोक मानतात... म्हणून तिकडच्या आजपर्यंतच्या प्रत्येक राजाचे नाव "रामा" आहे.... आत्ताचा राजा पण "रामा ९" आहे.....
असो...
तर आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो. ते म्हणजे "चाओ प्रया" नदीच्या काठावर....तिथे आमचं क्रुझ यायचं होतं. त्या आधी एक थाई मुलगी त्यांच्या पारंपारिक वेशात एका ऑर्कीड च्या फुलाला लेस लावून पिनेने ते सगळ्यांच्या शर्टाला लावाताना दिसत होती.... आम्हाला पण असे फुल ती लावेल असे वाटले ... आणि अपेक्षेप्रमाणे तसेच झाले.... आम्हाला पण तिने फुल लावले.... मग आमचे क्रुझ आले.... "प्रिन्सेस चाओ प्रया क्रुझ क्र. ३" क्रुझ फारच छान होते..... आत थाइ फुड ची सोय होती.... ति कॉंप्लीमेंट्री होती पण प ने असे दाखवले की ति त्यांनी आमच्यासाठी केली होती... (क्रुझ वर जसे काही आम्हीच ३४ जण होतो.... किमान २०० लोक होते,,,, आणि ह्यांनी जसं काही थाई फुड ची सोय आमची इच्छा होती म्हणून केली....)
प्रत्येक पदार्थाच्या खाली नावाची पाटी ठेवलेली होती..... मी शाकाहारी असल्याने सगळी नावे नीट वाचून खात्री करून घेणे मला भाग होते.... आधी एक दिवस आम्ही जेव्हा बाहेर थाई फूड खाल्ले होते तेव्हा "सॉम टम" नावाची डिश आम्ही ऑर्डर केली होती.... म्हणून मला माहीत होती की हा शाकाहारी पदार्थ आहे.... मी जेवण वाढून घेतले.....आणि पहिला घास सॉम टम चा खाल्ला.... आणि एकदम मला भयंकर माशांचा वास आला..... क्षणात मी घास तोंडातून बाहेर टाकला..... उलटी होणार असे मला वाटू लागले.... तोंडातला घास नीट पाहीला.... त्यात सगळा मुळा, कांदापात असे दिसले..... मग हा माशाचा वास कुठला... ताटातला प्रत्येक पदार्थ मी नीट चमच्याने हलवून चेक केला.... कशातच माशाचा नामोनिशाणा नव्हता..... मग मी ताटतले सॉम टम नीट पाहीले.... तर त्यात.... त्यात एक "श्रिम (Shrims)" होतं.... मला आयुष्यातलं महाभयंकर पाप केल्यासारखं वाटलं.... पण मग स्वप्नील ने मला समजावले.... कि तु श्रिम नाही खालं ना? तु तर बाकी भाजी खाल्लीस... नको काही वाटून घेउस.... मी परत मुड नीट केला आणि ताट बदलून आणलं..
आत सगळ्यांनी खुप मजा केली..... एक मुलगी आणि एक मुलगा सुंदर इंग्रजी गाणी गात होते,,,, आम्ही त्यावर खुप नाचलो..... तिला इतर लोक आपल्या मात्रुभाषा सांगून त्या भाषांमध्ये गाणे म्हणायला विनंती करत होते.... आम्ही पण तिला विचारले ..... हिंदी मध्ये गाणे म्हणणार का म्हणून .... तर तिने खरच हिंदी मध्ये "मेड इन इंडीया...."गाणे म्हंटले .... नदीच्या आजुबाजुला असलेली महत्त्वाची ठिकाणे ति मध्ये मध्ये दाखवत होती....
त्या दिवशी चा हा क्रुझ चा सुंदर अनुभव गाठीशी बांधून आम्ही रुम वर परतलो..... ह्या अपेक्षेत की उद्या सुद्धा असाच चांगला अनुभव येईल...
पुढच्या भागात...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: