शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ४

क्ष कंपनीची दिवसाच्या प्लॅन्स च्या वेळा सांगायची एक विशिष्ट पद्धत होती.... ते एक तीन अंकी लकी नंबर सांगायचे.... त्या नंबरचा पहिला आकडा म्हणजे "वेक अप कॉल", दुसरा म्हणजे "ब्रेकफास्ट" आणि तिसरा म्हणजे "बाहेर जायला निघायची वेळ" आणि फी ने आम्हाला आमचा लकी नंबर सांगितला.... आणि आम्ही सगळे जण "काSSSSSSSSSSSSSSSSSSSSय?????" असं ओरडलो..... ज्याला प आणि सगळेजण लकी नंबर म्हणत होते तो नंबर ६७८ होता....... आमचं डोकंच काम करत नव्हतं .... पहाटे उठून फिरायला जायचं असतं तर आम्ही फॅमिली टुर ला नसतो का गेलो...पैसे पण वाचले असते....आणी पहाटे उठायचं आहे ह्याची मनाची तयारी पण केली असती... आम्ही दोघांनी आणि आमच्या सोबत अजून दोघांनी (दोन कपल्स) विरोध केला.... पण १७ मधून ३ कपल्स नां हे पटलं नव्हतं फक्त.... त्यामुळे आमच्या बोलण्याचा काही उपयोग नाही झाला.... ६७८ फायनल झालं आणि ह्या इतर मंद लोकांसोबत आपण भरडले जाणार असं आम्हाला वाटायला लागलं.... हॉटेल मध्ये पोहोचल्यावर आम्ही तिघे एकत्र आलो.... "आता उद्याचं जाऊदेत पण परवा ह्या वेळेला आपण विरोध करायचा... " आता आम्हाला कळलं होतं की कोण सेन्सीबल आहे....
दुसय्रा दिवशी पण आम्हाला १५ मिनिटे उशीर झाला.... आणि परत प ने उपदेशाचे डोस पाजले..... आम्ही सहजपणे त्याकडे दुर्लक्ष केलं.....
त्या दिवशी आम्ही कोरल आयलंड ला जाणार होतो.... मोटर बोट मधून तिकडे पोहोचलो..... आणि पॅरासेलिंग केलं.... तो अनुभव इतका सुंदर होता की सगळे वॉटरस्पोर्टस करायचे असे आम्ही ठरवले.... परत किनाय्रा वर आलो... बनाना राईड, अंडर सी वॉक अशा अनेक गोष्टी होत्या.... पहिले अंडर सी वॉक करायचं कोरल्स पहायचे.... कोरल आयलंड वर ह्यांनी त्याचसाठी आणलं आहे.... प ने हाक मारली "हे पीपल, दोझ हु वाँट टु डु अंडर सी वॉक , कम हिअर....." आम्ही धावतच तिकडे गेलो..... आणि परत तिने आधीच्यासारखंच केलं..... "यू हॅव टु पे ६००बाथ पर परसन" व्हॉट????? परत????? कोरल आयलंड तर आमच्या टुर चा महत्त्वाचा भाग होतं ना मग ति कोरल्स तरी दाखवा स्वतः पण हे बोलुनही उपयोग नव्हता.... इतर मठ्ठ लोकांनी आप आपले पैसे देऊन टाकले होते....१२०० बाथ" म्हणजे १५००रुपये होतात जवळजवळ...इथेही नाइलाज होता,,, सोबत हे पण कळलं की इकडे सगळ्या ठिकाणी आपणच पैसे भरायचे आहेत.... पॅरासेलिंग शिवाय ह्यांच्या पॅकेज मध्ये काहीही नाही....आणि ह्या कशावरही आम्ही ३ कपल्स वगळता कुणाचाही आक्षेप नव्हता.... सगळे जण आपल्याकडे असलेले पैसे विनासायास उधळत होते.... आणि कशाचाही विचार न करता त्यांच्या रिस्पेक्टिव बायका पण ते पैसे उधळून घेत होत्या..... आपण परदेशात आलोय ह्याचा आनंदच गगनात मावत नव्हता त्यांचा,,, आणि सहज १२००, ८०० बाथ" ते उडवत होते,,,टुर मध्ये प्रत्येक ठिकाणी थाइ लोक आपले फोटो काढून आणून देत... एका फोटो चे १०० किंवा २०० बाथ" पडत होते.... प्रत्येक जण सगळ्या ठिकाणी फोटो काढत होते, आपले, बायको चे, दोघांचे सुद्धा.... पण तरी लोक त्या थाई लोकांकडून ते २०० बाथ" वाले फोटो विकत घेत होते...आठवण म्हणून आम्ही सुद्धा २ घेतले.... पण त्यातही प्रत्येक वेळी विनाकारण पैसे घालवण आम्हाला योग्य नाही वाटलं ... कोरल आयलंड ला जाताना मध्ये अंडरवॉटर वर्ल्ड आहे.... तिकडे समुद्राखालून काचेचा बोगदा केला आहे.कोरल्स पहण्यासाठी... सिंगापुर सारखा.... तिकडे जाणार असं सुद्धा आम्हाला सांगीतलं होत, पण आम्ही ति बिल्डिंग बस मधुनच पाहीली.... कारण आम्हाला तिकडे नेलंच नाही....
आम्ही बीच वर खुप फिरलो, ६जण एकत्र फिरलो, खरेदी केली, प चं म्हणणं होतं की इकडे सगळं महाग आहे.... इकडे घेउ नका, पण आम्ही थोडी खरेदी केली.... आम्हाला असं वाटलं नाही की ह्याहून स्वस्त मिळेल....
थोड्यावेळाने आम्ही सगळे निघालो.... बस मध्ये बसलो. बोलता बोलता अस कळलं की सी फेसिंग रुम कुणालाच नाही मिळाली..... हे क्ष कंपनी वाले सहज रित्या आम्हाला फसवत होते....एक तासाने जेवायच्या जागी पोहोचलो, पाहतो तर काय सकाळी जसा कालचाच नाश्ता होता तस जेवणात पण छोलेच होते ... कालसारखीच भाताची खीर होती...रोज जेवायला पण हेच की काय???? जेवलो कारण भुक लागली होती आणिपुढे कुठे जायचं ह्याचा विचार करत होतो..... प ने सांगीतले आता परत जायचं हॉटेल वर.... काय? परत १ तास घालवून? आणि फिरायचं काय??? पहाटे उठवून हि बया आम्हाला दुपारभर हॉटेल मध्ये बसवणार की काय???? हो ति तसच करणार होती.... पुढची राउंड ६ वाजता होती..... त्यात काय वाढून ठेवलं आहे ह्याचा शोध घ्यायचा होता.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: