शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग १०

आजचा दिवस आमच्या टुर चा शेवटचा दिवस होता..... आज सकाळीच आम्ही शॉपिंग साठी बाहेर पडलो. सगळं सामान घेउन चेक आउट करा आणि मग जा असे सांगितले होते.... आम्ही चेक आउट केले आणि शॉपिंग साठी बाहेर पडलो. दुपारी त्याच ठरलेल्या जेवणच्या रेस्टॉरंट मध्ये जमायच होतं. १२ वाजता.... ४ च्या विमानाने परत यायच होतं....
सांगण्यासारखं आता काहीही नव्हतं पण इथेही आमची फसवणूक झाली होती.... ७ दिवसांच्या टुर मधला हा आजचा ७वा दिवस प्रवासात जाणार होता.... रात्रीच्या विमानाची तिकिटे काढली असती तर आमच अजून बरच काही पाहून झालं असतं.... पण त्यासाठी क्ष कंपनीला खर्च करावा लागला असता ना....त्या दिवसाचं आमचं हॉटेल मध्ये राहणं आणि फिरण्याचा....
जेवून निघाल्यावर बसमध्येच प ने आमचा निरोप घेतला ... वास्तविक पाहता ती पण मुंबई ला परतणार होती.... तिने कशाचाच खेद व्यक्त नव्हता केला...पण आम्हाला अजुनही काही बोलायचे होते. तिने दिलेल्या फीडबॅक फॉर्म वर आम्ही तिच्याबद्दल असलेल्या सर्व तक्रारी लिहिल्या होत्या.... दुर्दैवाने ते फॉर्म्स तिच्याकडेच द्यायचे होते.... आम्ही लिहिलेला फॉर्म तिने कदाचीत फाडुनही टाकला असेल.
आम्ही ४ च्या विमानात बसलो..... भारतात ७.३० वाजले होते.... ४ तासाचा प्रवास करून भारतात परत आलो तेव्हा रात्रीचे ११.३० वाजले होते,,,,, प्रवासाचा ७वा दिवस संपला होता..... पण भारतात....
सारांश पुढील भागात...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: