शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ११ सारांश

ह्या संपूर्ण अनुभवातले काही महत्त्वाचे मुद्दे एका वेगळ्या भागात लिहावेत असे वाटले.... म्हणून हा सारांश लिहिण्याचा खटाटोप.
१. विविध कारणे देवून आमचे टुर २ वेळा एकंदर ५ दिवस पुढे ढकलली.... ह्याने आम्हाला दोघांनाही सुट्टी वाढवून घ्यावी लागली.... आणि ५ दिवसांचा लॉस ऑफ पे भोगावा लागला..... ह्याबद्दल तक्रार केली असता खुद्द मॅनेजर उद्धटपणाने बोलत होता..... क्ष कंपनीचे लोक इतके निगरगट्ट आहेत की त्यांना अशा प्रकारे बोलल्याची आणि आपल्यामुळे इतरांना (ग्राहकाला) त्रास झाल्याबद्दल खेद व्यक्त करावा असेही वाटले नाही....
२. सुवर्णफुमी विमानतळावर इमिग्रेशन कसे करावे हे सांगायला कुणीही नसल्याने सर्वांनाच त्रास होत होता.... परंतु एका जोडप्याला ह्याचे बरेच वाईट परिणाम भोगावे लागले.... बाहेरच्या देशात आणि ते सुद्धा भाषा कळत नसलेल्या परिसरात ते हरवले होते....
३.रात्रभर विमानाचा प्रवास केल्यावर पुन्हा लगेचच ३ तासाचा बसचा प्रवास हा ओढवून आणलेला होता.... जर सकाळीच बँकॉक मध्ये हॉटेल गाठले असते तर दुपारी ३ पर्यंत च्या वेळेचे हॉटेल चे पैसे जास्त भरावे लागले असते.... (ईंटरनॅशनल वेळेप्रमाणे हॉटेल चा दिवस हा दुपारी ३ ते दुसर्या दिवशी दुपारी १२ पर्यंत असतो.... आम्ही सकाळीच हॉटेल मध्ये गेलो असतो तर सकाळ ते दुपारी ३ पर्यंतच्या वेळेचे पैसे भरावे लागले असते. आम्हाला प्रवासात अडकवून क्ष कंपनी ने ते वाचवले)
४.टायगर शो, अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्टस, सफारी वर्ल्ड मध्ये ६ पैकी ४ शो दाखवून २ शो चे पैसे तुम्हाला भरावे लागतील, हे आमच्या पॅकेज मध्ये नाहीये... असे सांगून पैसे भरायला लावणे. ही सुद्धा आमची झालेली फसवणुक होती....
५‌. हॉटेल च्या सी फेसिंग रुम्स आहेत सांगून ते तसे नसणे हि सुद्धा फसवणुक होती....ह्यासोबत मिनी बार, कॉफी मेकर असं सगळं जे ३ ऑर ५ स्टार हॉटेल मध्ये प्रत्येक रुम मध्ये असतं त्या सगळ्या सोयी काढून घेण्यात आल्या होत्या
६.सकाळ संध्याकाळ जेवायला नेण्यासाठी १-१ प्रमाणे दिवसाचे ४ तास प्रवासात घालवणे हा फसवणुकीचाच भाग होता... ह्यासोबत रोज तेच तेच जेवण आणि तोच नाश्ता देणे हे सुद्धा वाईट होते....
७.रोज सकाळी लवकर बाहेर पडायला लावून नंतर दुपारी ४ तास रुम मध्ये बसायला लावणे हे सुद्धा मुर्खपणाचे लक्षण होते.
८.क्ष कंपनीने फसवले त्याचप्रमाणे प ने काही ठिकाणी वस्तुंच्या किमती वाढवून सांगणे ही लज्जास्पद गोष्ट होती... (उदाः थाई मसाज ची किंमत १५० बाथ न सांगता २५० बाथ सांगणे)
९.प्रत्येक ठिकाणी पुरेसा वेळ पर्यटनासाठी न देता घाई करणे (मिनी सियाम, सफारी वर्ल्ड, नाँग नूच व्हिलेज.) तसेच कारणाशिवाय ठिकाणे न दाखवणे (रॉक ग़ार्डन)
अशा सर्व प्रकारे आमची फसवणुक करुनही शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनस विमानतळावर उतरलो तेव्हा प ने आम्हाला बाय म्हणण्याची, ओळख देण्याची किंवा आमची दखल घेण्याचीही कर्टसी दाखवली नाही.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: