शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ९

दुसरा दिवस उजाडला तो परत आमचं स्वागत टाळ्यांनि करत..... आणि आम्ही अत्यंत मनोभावे त्याचा स्विकार केला... (हेहेहेहे आता तरी लोकांना वाटायला हवे होते की त्यांचे काहीतरी चुकते आहे.) आज मात्र गोष्टं टाळ्यांवर थांबली नाही.... आमच्या बाजुला म्हणजे बाजुच्या सीट वर एक बंगाली जोडपे बसत होते.... ते कायम वेळेआधी १० मिनिटे येउन उभे रहात असत .... बहुतेक ते टुर एन्जॉय करायला येण्यापेक्षा वेळा पाळायला आले असावेत.... रोज ऑफीसला वेळेवर पोहोचतात की नाही कुणास ठाउक पण इकडे मात्र वेळेवर येउन उभे राहत असत..... त्याने त्या दिवशी बोलायला सुरुवात केली.... "सी 'प' धीस इज बॅड.... बीकॉझ ऑफ दीझ पीपल वुइ आर नॉट ओन्ली लुझिंग अवर टाईम बट वुइ आर लुझिंग अवर मनी ऑल्सो" आम्हाला हसू आवरेना.... (माणसं एक्साईट झाली की बरळतात असे काहीबाही)लूझिंग मनी???? ह्या माणसाला वेड लागलं आहे.... ह्याचे कुठले पैसे गेले???? हाहाहा तो फारच तावातावाने बोलत होता.... आणि ते पण इंग्रजी मध्ये (काही लोकांना वाटतं की आपण इंग्रजी मध्ये बोललो म्हणजे आपण फार भारी .... हे त्याच कॅटेगरी मधले वाटत होते...)त्याला त्याची बायको साथ देण्याचा प्रयत्न करत होती.... इथे स्वप्नील ने उत्तर देण्याचे ठरवले....
"""""सी बेसीकली वुइ आर हीअर फॉर हनीमुन... वुइ शुड एन्जॉय ऍज वुइ वॉंट..... होपलेसली वुइ आर गेटिंग अप सो अर्ली इन द मॉर्निंग .... इटिंग सेम फुड..... ऍंन्ड वुइ आर ऑल्वेझ इन हरी...इफ यु डोंट थिंक धिस इस होपलेस.... वुइ फील सो..... ऑल्सो.... युवर वर्डस मेक नो सेन्स फॉर अस ऍझ वुइ आर नॉट गोइंग टु मीट आफ्टर धिस टुर..... यु आर ऑल्सो अवेअर दॅट यु इव्हन डु नॉट गिव्ह अ स्माइल इफ एनी वन ऑफ अस कम इन फ्रंट ऑफ इच अदर ..... सो वुइ आर सिंप्ली गोइंग टु इग्नोअर यु..... ऍंन्ड युवर टॉक्स.... ऍंन्ड येस .... व्हेन यु टॉक अबाउट टाईम... कीप इन माइंड दॅट वुइ आर सॉफ्ट्वेअर इंजीनीअर्स.... वुइ वर्क इन वर्ल्डस लीडिंग IT कंपनीज.... वुइ नो द इंपॉर्टन्स ऑफ टाइम....ऍंन्ड डोंट नीड युवर ऍडव्हाइस"""""
त्या दोघांना आणि इतर सगळ्यांनाच धक्का बसला..... आणि प अचंबित नजरेने आमच्याकडे पाहत राहीली.... आता इतर लोकांना आमचे म्हणणे पटत असल्यासारखे वाटत होते..... आज बस मध्ये आम्ही ६ जण वगळता कुणीच बोलत नव्हते.....
आम्ही पुढच्या डेस्टीनेषन ला पोहोचलो.... "सफारी वर्ल्ड" ९ वाजले होते.... १ तास सफारी साठी होता..... मला सुरुवातीपासुनच वाटत होते की हा वेळ कमी पडणार आहे.... पण परत प्रॉब्लेम हाच होता कि आम्ही बोललो तरी इतर १४ कपल्स ना ते पटायला हवं आणि त्यांनी तो मुद्दा उचलून धरायला हवा...
आम्ही गेट मधून आत शिरलो.... आता सगळीकडे प्राणी दिसायला सुरुवात झाली होती.. प्रथम दर्शन आम्हाला एका छोट्या तळ्याकाठी असलेल्या अनेक घरट्यांमध्ये बसलेल्या विविध पक्षांनी दिले..... पेलिकन्स, स्पून बिल, पेंटेड स्टॉर्क असे अनेक पक्षी दिसत होते.... ते सुद्धा थव्यांच्या स्वरुपात.... माझे वडील वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहेत. पक्षी पाहण्याचा इतका छंद त्यांना का आहे आणि इतके पक्षी एकत्र पाहून त्यांना काय वाटत असेल ह्याचा मला साक्षात्कार होत होता....आमचा डोंबिवलीमध्ये २० वर्षे जूना फोटोस्टुडिओ आहे.... घरी सगळ्यांनाच छायाचित्रण येते..... मी सुद्धा प्रोफेशनल कॅमेरा नेलेला.....आणी जीव झोकून उत्तम फोटो काढायचा प्रयत्न करायचा असे ठरवले होते...इतके पक्षी दिसल्यावर मी कॅमेरा घेउन सरसावले.... स्वप्नील डिजी कॅम वर व्हिडिओ शुटिंग करत होता.... एक दोन अनेक फोटो काढले.... पण मनासारख काहीतरी होत नाहिये हे कळत होतं.... काय होतय????? काय होतय??? अरे!!!!!!!!!!! हे बस एक क्षणही थांबवत नाहीयेत..... बाकी सगळे जनरल फोटो काढताहेत कारण त्यांना ह्याने फरकच पडणार नाहीये.... त्यांचा द्रुष्टीकोनच वेगळा आहे.... पण हि बस ३० सेकंद तरी थांबणं मला गरजेचं आहे..... मी फी ला सांगीतले....प्लीज प्रत्येक ठिकाणी प्राणी, पक्षी दिसतील तिकडे किमन ३० सेकंद बस थांबव.फि लगेच तयार झाला... (बहुतेक आता तो सुद्धा आम्हाला घाबरत होता... [:-)] )परत सगळ्यांची चंगळ.... माझ्यामुळे सगळे आरामात फोटो काढू शकत होते..... एकामागोमाग एक प्राण्यांचे कळप च्या कळप दिसत होते.... आणि आम्ही आनंदाने नाचायचेच बाकी होतो.... भारतात कोणत्याही मोठ्या जंगलात जरी ८-८ दिवस मचाणावर जाउन राहिलो तरी फारसे काही प्राणी दिसत नाहीत असा माझ्या बाबांचा अनुभव मी अनेकदा पाहिला होता..... आणि वाघ सिंह तर दुर्मिळच झालेत.... त्यामुळे आम्हाला परमानंद मिळतोय.... आणि ते सुद्धा कदाचित आम्ही पामर त्याच्या योग्यतेचे नसताना असे मला वाटत होते.वाघांचा एका लहान मचाणावर बसलेला ६ वाघांचा कळप, त्याच मचाणाखाली २ वाघ लोळत पडलेले.... त्याच्याच विरुद्ध बाजुला एक जंगलाचा राजा एका आडव्या पडलेल्या झाडाच्या खोडावर आपल्या शाही पोझिशन मध्ये बसलेला,४ सिंहिणी आजुबाजुला पहुडलेल्या आणि २ बेबी सिंहीणी झाडावर चढायच्या प्रयत्नात असलेल्या पाहील्यावर मला आणि स्वप्नील ला "अजी म्या ब्रम्ह पाहीले" असेच वाटू लागले.... इथे मात्र मी २मिनिटे तरी बस थांबवा अशी रिक्वेस्ट केली.... आणि मनसोक्त फोटो काढून घेतले त्या माणसाच्या मनातल्या राजाचे "वाघांचे" आणि जंगलाच्या राजाचे....
सफारी संपली आणि आम्ही ह्याच सफारी च्या पॅकेज मध्ये असलेले ४ शो पहायला गेलो...."ओरांग उट्टान शो", "बर्ड शो", "सी लायन शो" आणि "डॉल्फीन शो" सगळेच शो फारच सुंदर होते.... ओरांग उट्टान माकडांना ट्रेनिंग देउन आणि सी लायन प्राण्याना ट्रेन करून चालवलेले हे शो जगात फक्त थायलंड मध्ये आहेत.... बर्ड शो आणि डॉल्फीन शो जगात अनेक ठिकाणी चालवले जातात.... मुक्या प्राण्यांच्या अनेक करामती पाहून आम्ही अचंबित झालो होतो.....दुपार होत आली होती आम्हाला जेवण तिकडेच होते.... भयंकर प्रकारे बनवलेल्या ३भाकय्रा एकत्र ठेवल्यावर जेवढी जाड भाकरी दिसेल तेवढ्या जाड तेलकट्ट पुय्रा...विचित्र भाज्या असे जेवण होते..... असेही आम्ही फ़ारसे काहीही खाउच शकलो नव्हतो इतक्या दिवसात.... त्यामुळे हे सुद्धा काही नवीन नव्हते..... आम्ही नेहमीप्रमाणे शेवटी खाण्याच्या फळांवर जगलो.... तिकडे मिळणारी फळे ही एकच खाण्यायोग्य गोष्ट होती... आणि आवडती सुद्धा... आपल्या सारखी फळे नव्हती पण ओळखीची होती.... कधी कधी पेरू आणि पेर असत... पण प्रामुख्याने "जांभ" जे आपल्याकडे ग्रीनीश व्हाईट कलर मध्ये मिळतात ते पिंक कलर चे असत आणि ते पण सफरचंदाच्या साइझ चे..... पण चवीला अत्यंत गोड.... आमचे ते आवडते झाले होते.... जर परदेशातून फळे आणता येत असती तर आम्ही बॅगा भरून तेच आणले असते.... असो... तर त्या दिवशी सुद्धा आम्ही फळांवर जगलो...पण सकाळ सुरेख गेल्याने आजचे जेवण खराब असले तरी आम्हाला फरक पडणार नव्हता.....
दुपारी आम्ही "बायोक स्काय हॉटेल" ला जाणार होतो... बायोक स्काय हे थायलंड मधील सगळ्यात उंच हॉटेल होते.... त्यांनी ८५ व्या मजल्यावर एक रोटेटिंग ओपन डेक बनवला होता ज्यावरून बँकॉक सिटी चा ३६० डिग्री व्हिऊ पहायला मिळत असे..... आम्ही ह्या जागी सुद्धा खुप मजा केली..... ८५व्या मजल्यावरून खाली पाहताना खुप छान वाटत होते....आजची संध्याकाळ इंद्रा स्क्वेअर नावाच्या शॉपिंग मॉल मध्ये घालवायची होती आणि बँकॉक शॉपिंग साठी प्रसिद्ध असल्याने आम्ही सगळ्यांनी चंगळ करून घेतली..... इंद्रा स्क्वेअर स्वस्त आणि मस्त जागा आहे हे अनेकांनी सांगीतले होते.....
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला होता...पण त्याची सगळी मजा रात्रीचं जेवण परत एकदा घालवणार होतं.... तेच छोले..... त्याच रोट्या.... आणि तीच भाताची खीर.... लग्नानंतर मुली सासरी नवे नवे पदार्थ करून खायला घालतात... मी इथेच मनोमन ठरवलं होतं की मी ४ महिने हैद्राबाद ला असताना भाताची खीर शिकले असले तरी आता आयुष्यात घरी बनवायची नाही.....
पुढील भागात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: