शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ५

संध्याकाळी ६ वाजता आम्ही सगळे बस मध्ये जमलो. आजचा संध्याकाळचा प्लॅन थाई मसाज चा होता...
मी स्वतः मसाज शिकलेले असल्याने मला कधीच स्वतःवर मसाज करून घेता आला नव्हता.... उलट मला शास्त्रोक्त मसाज येत असल्याने सगळे मला मसाज करून द्यायला लावायचे.... आजची संधी माझ्यासाठी उत्तम होती. आणि चक्क मसाज आमच्या पॅकेज मध्ये होता...
आमच्या बसमध्ये जागा ठरलेल्या होत्या.मी आणि स्वप्नील दुसय्रा सीट वर बसलो होतो....पुढच्या सीट वर प होती.... ड्रायव्हर च्या बाजुला फि बसत असे, प आणि फी चे काहीतरी बोलणे चालू होते... मागेच बसलेले असल्याने ते आमच्या कानी पडले...
पः "एकदा मसाज केल्यावर कुणाला दुसय्रांदा करून घ्यावासा वाटला तर किती पैसे लागतील.... ?"
फिः १५० बाथ लागतील.... कारण एकदा मसाज केला म्हणजे पहिला तास झाला आणि आपण मसाज अजून तासभर पुढे वाढवला तर थोडे पैसे कमी पडतात...
(थायलंड मध्ये सगळीकडे मसाज साधारण १७०/२०० बाथ जास्तीत जास्त असा पडतो)
प उभी राहीली.... माइक घेउन तिने फी ने सांगीतलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली.... "तुमचा मसाज झाला की तुम्हाला अजून तासभर जास्त मसाज करून हवा असेल तर २५० बाथ पर परसन लागतील"
[:-O]
हि ढळढळीत खोटं बोलते आहे..... एका मिनिटापुर्वी आपण १५० बाथ ऐकलं आहे... म्हणजे हि असे अनेक ठिकाणी पैसे काढत असणार.... तरीच काही ठिकाणी थाई लोकांनी काढलेले फोटो १०० आणि काही ठिकाणी २०० बाथ आहेत... क्ष कंपनी तर आपल्याला फसवते आहेच पण ही मुलगी बाकी ठिकाणी फसवते आहे...
प आणि फी चे बाकीचे संभाषण स्वप्नील ने ऐकले होते.... ते असे होते...
((((फिः १५० बाथ लागतील.... कारण एकदा मसाज केला म्हणजे पहिला तास झाला आणि आपण मसाज अजून तासभर पुढे वाढवला तर थोडे पैसे कमी पडतात...))))
पः म्हणजे आपण ह्यांना २५० बाथ सांगु...
फी : कशाला उगीच... १५० बाथ आहेत ... असं करणं योग्य नाही....
पः यु लिसन टु मी... वुइ वील टेल देम २५० बाथ....
असे म्हणून ती ऊठली...आणि आम्हाला २५० बाथ सांगीतले....फी ला ते पटले नसावे... तो उठून आपल्या सीट वर जाउन बसला....
माझी परत एकदा मसाज करून घ्यायची इच्छा होती पण आपण खर्च केलेले पैसे पूर्ण त्या मसाज करणाय्रा बायकांच्या हातात जाणार नाहीत हे फीलींग मला परत एकदा मसाज करून घेउ देत नव्हतं... त्या दिवशी पहिल्यांदा मला कळलं कि सगळे नातेवाइक माझ्याकडून मसाज का करून घेतात..... जे रीलॅक्सेशन मिळतं ते किती गरजेच असतं हे मला पहिल्यांदा कळत होतं....
कुणीतरी तिला "तुम्हाला ह्या मसाज ला आमच्यासाठी किती रुपये लागतात" असे विचारले... प ने ३००बाथ सांगीतले..... मला आणि स्वप्नीलला त्या विचारणाय्राचं हसू यायला लागलं. लोक किती आंधळे असतात... जरी प आणि फी चं बोलणं ऐकलं नसेल तरी आजुबाजुला सगळ्या रस्त्यांवर मसाज सेंटर दिसतात... त्यावर पैसे पण लिहिलेले असतात.... आणि ह्याचा ३०० बाथ वर विश्वास बसला होता.... आम्हाला हसताना पाहून प ने सारवासारव करायला सुरुवात केली.... म्हणे तुम्हाला स्वस्त मसाज सेंटर पण दिसतात... पण हे महाग आहे... क्वॉलीटी वगैरे वगैरे..... वास्तवीक पाहता आम्ही पुर्ण संवाद ऐकला होता.... त्यानुसार जर दुसय्रा तासाला १५० बाथ पडणार होते तर पहिल्याला १७० किंवा २०० बाथ पडले असणार होते,,,, असो.....
त्या मसाज सेंटर वरून आम्ही जेवायला जाणार होतो... १ तासाचा नसता प्रवास आणि रोज एकाच हॉटेलात "भारतीय जेवण" ह्या नावाखाली तेच पदार्थ आमच्या वाट्याला रोजचे लिहिलेले होते... वास्तवीक पाहता आम्ही सगळे तरुण होतो, वयस्कर माणसं असली तर गोष्टं वेगळी .... रोज भारतीय जेवणाची आम्हाला गरज सुद्धा नव्हती.... दुपारी पिझ्झा, रात्री थाइ जेवण, कधी कधी बर्गर , चायनीज काहीही आम्ही खाउ शकत होतो....थाइ फुड खाउन पहायचं सुद्धा होतं .... पण आम्ही तुम्हाला घरचं जेवण देतो ह्या नावाखाली रोज तेच जेवण आणि १ तास जाणे आणि १ तास परत येणे ह्यात फुकट घालवलेला वेळ आम्ही टाळू शकत नव्हतो.... आमच्या दुर्दैवाने सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्यात खरच बदल नव्हता... आणि ह्यात खरच कुठलीही अतिशयोक्ती नाही,,,, भाताची खीर आणि छोले आमच्या वाटेतून हटत नव्हते.... शेवटी आम्ही फळे, सॅलेड, भात, एखादी नान आणि जे काही दुसर मेनू मध्ये असेल ते खाउन रहायला सुरुवात केली.... विरोध करणारे आम्ही फक्त ६ जण असल्याने कुणालाच काही फरक पडत नव्हता....
जेवण झाल्यावर परत येताना तिने दुसय्रा दिवसाचा लकी नंबर सांगीतला.... तो ६७८ ऐकल्यावर आम्ही ६ जण तिच्याकडे गेलो.... ९.१५ होत असावेत त्या वेळेस...
आम्हीः आम्हाला ६७८ पटलेले नाही... इतक्या लवकर उठुन येणे आम्हाला शक्य नाही....
पः का??? बाकी कुणालाच काही प्रॉब्लेम नाहीये...
आम्हीः हो पण आम्हाला आहे..... हि काही शाळा नाहीये.... कि पहाटे उठून पहिल्या घंटेला हजर रहायचं. इतक्या लवकर आम्ही येउ शकणार नाही....
पः कां पण? अत्ताशी ९.३० होत आहेत..."यु कॅन स्लीप अर्ली टुडे"....
ह्या वाक्यावर आमच्यातल्या एकाची बायको जाम चिडली..... आणि तिला म्हणाली... "आय थिंक यु नो दॅट वुइ आर हियर फॉर अवर हनिमुन...... वुइ कॅन नॉट कम ऍट ७ फॉर ब्रेकफास्ट.... अँड दॅट इज फॉर शुअर....."
हे ऐकल्यावर प चपापली.... तिच्या चेहय्रावर असे भाव होते जणू तिला माहीतच नाहीये की आम्ही हनिमून ला आलो आहोत... (टुर coordinator म्हणे) तिला कळलं आम्ही चांगलेच भडकलो आहोत....
पः ओकेओके .... आय विल सी टु धिस मॅटर.... अँड लेट यु नो द चेन्जेस....
तिने परत येउन बदललेल्या वेळा सांगीतल्या.... सगळ्यांना खुप आनंद झाला.... आपल्याला जर एखादी गोष्ट पटत नाहीये तर सांगायची हिंमत कुणात नव्हती..... आम्ही जाउन वेळ बदलून घेतली तर सगळे खुश..... आयत्या बिळावर नागोबा म्हणजे काय ह्याचा पदोपदी प्रत्यय येत होता....दुसय्रा दिवशीचा कोड ७८९ होता.... निदान एक तास जास्त झोप मिळेल.... पण उद्या सकाळपासून अजून कशाकशाला तोंड द्यायचं आहे हे कळलं नव्हतं.....रोज एका नव्या प्रश्णाला उत्तर देण्याची तयारी ठेवून आम्ही झोपी जात होतो....
पुढच्या भागात.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: