शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग १

२० जानेवारी २००८ ला माझे लग्न झाले... प्रेमविवाह असल्याने आम्ही खूप आधीपासूनच अनेक ठिकाणांची माहिती करून घेऊन मगच एका नामांकित टूर कंपनीच्या "बँकॉक-पत्तया स्पेशल" हनिमून टूर चे बुकिंग केले.२७जानेवारी ला आमचे रात्री १२ च्या विमानाचे बुकिंग झाले, आणि आम्ही आपल्याला एक उत्तम टूर मिळाली ह्या आनंदाने सुखावलो. आम्हाला सतत त्या टूर कंपनीच्या लोकांचे सतत फोन येत होते.... तुम्ही लवकर पासपोर्ट आणा...व्हिसा चे काम लवकर केले पाहिजे.... लग्नाला २ महिने होते... तरीही आम्ही घाईने त्यांना सगळी कागदपत्रे दिली... आणि आम्हाला अचानक एक दिवशी फोन आला की....."तुमची टूर पुढे ढकलली आहे.... आमच्याकडे तेवढे बुकिंग झाले नाही...." पुढची तारीख ३१जानेवारी आहे,,, आमचा पूर्ण विरस झाला..... ह्याला काय अर्थ आहे? शक्य नाही तर दर २ दिवसांनी परदेशातली टूर ठेवायची नाही.... आम्ही त्या लोकांशी खूप बोललो.... परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी ३०००० रुपये भरले आहेत ... म्हणून गप्प बसलो आणि आपली टूर ३१ चीच आहे अस समजायला लागलो. लग्नाच्या मूड चा विरस नव्हता करायचा....
लग्नाच्या १ आठवडा आधी परत एक फोन आला "टूर अजून एक दिवसाने पुढे ढकलली होती" मग आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो.... खूप वादावादी झाली... त्यांचा ब्रांच मॅनेजर आला.... आम्हाला म्हणे "कंपनीला नाव ठेवू नका...आम्ही काही करत नाही.... वरचे लोक सगळं ठरवतात आम्हाला सांगू नका...." जास्त आवाज करायचं काम नाही...." हे म्हटल्यावर आमचं डोकं फिरलं.... ऍड आय सेड " यू आर पेड फॉर धिस... " कस्टमर ला तुम्ही सॅटिसफाय नाही करू शकत तर हे तुम्हाला ऐकावंच लागेल.... आणि ...." जास्त आवाज करायचं काम नाही...." ह्याची आम्ही तक्रार करणार आहोत.... तुम्ही मनाला येईल तसं आणि हवी तेव्हा हवी तशी टूर पुढे ढकलाल.... तुमच्या सोयीनुसार आमच्या कंपन्यांनी आम्हाला सुट्टी द्यायची का???
आम्ही खूप प्रयत्न केला..... परंतू ह्या प्रकाराला आम्ही काहीही करू शकलो नाही.... सोबत असणाय्रा इतर लोकांची काही माहिती असती तर एकत्र करू शकलो असतो काहीतरी..... शेवटी लग्नानंतर ११ व्या दिवशी आम्ही टूर साठी निघालो....
आणि तिकडे गेल्यावर कळले..... की आता पहिल्यासारखेच विचित्र अनुभव अजून येणार आहेत....
पुढील भागात.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: