बुधवार, १८ मार्च, २००९

पुर्वी होतं जसं...

आज माझे शब्द संपले आहेत...
मनात वादळ असलं तरी....
तुझ दु:ख किती सलतं मला
सल तुला आणि वेदना माझ्या उरी...

कोणत्या क्शणाची चूक ही...
कि कोणत्या घटनेची परिणति
कोणत्या विचाराने माझ्या सांग
अशी बोच तुला दिली...

कळेनासंच झालय...
हे काय चाललं आहे...
मनात नसुनही असं काही
माझ्याकडुन का होतंय

शंभर प्रश्न उभे समोर,
पण कशाचंच उत्तर मिळत नाही...
मनात येत असुनही मला
प्रायश्च्चित्त काही करता येत नाही...

काय करु?
तुच सांग आता
तुलाही कसं सांगायचं
उमजेना मला...

सारं काही मान्य आहे...
तुझा रोश सोडुन..
तु परत तसाच हवास...
सगळा राग विसरुन...

खरंच सांगते तुला
पुन्हा असं नाही होवु देणार...
मनातल्या विचारांचा गोंधळ
शब्दात नाही होवु देणार...

जमत असेल तर एकदा
पुन्हा विश्वास ठेवुन पहा
तुझ्या समाधानासाठी एखादी
शिक्शा करुन पहा...

सगळं काही मान्य मला
तू म्हणशील तसं...
पण तसच हवं सगळं
पुर्वी होतं जसं...

पुर्वी होतं जसं...
पुर्वी होतं जसं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: