बुधवार, १८ मार्च, २००९

मराठी ब्लॉग विश्व






भाव असाच समजुदे, स्पर्शाला स्पर्शाचा!!!

किती पटकन म्हणतोस तू
मला तुला मिठीत घ्यायचंय


अश्या ठिकाणी भेटायचंय...
कोवळ्या रानफुलांच्या जागी
हळुवारपणे स्पर्शायचंय
अन कशा कशाचं बंधन न पाळता
तुला घट्ट कवेत घेउन बसायचंय...
किती अवघड जातं मला
जेव्हा ह्या प्रश्नाला उत्तर मागतोस
माझ्या सगळ्या म्हणण्यावर
तुला काय वाटतं? असं विचारतोस...
कसं सांगायचं तुला
काय येतं माझ्या मनात!!
सांगण्याचा प्रयत्न केला तरी
लाज येते आडवी शब्दात...
मनामधलं सगळं काही
ओठांवर येउन अडून राहतं
पण तुझ्या स्पर्शाचं फुल मात्र
क्षणोक्षणी खुलत असतं...
कल्पनाही एवढी सुंदर असते
अश्या क्षणांना जाणवतं
तुझ्या जवळ असण्याचं
अजून एक स्वप्न जागं होतं...
माझ्या सगळ्या स्वप्नांचं
सगळं श्रेय तुला
अंतरीचा प्रत्येक भाव
फक्त तुझ्या असण्याचा
माझा प्रत्येक श्वास
फक्त तुझ्या प्रेमाचा
अन आयुष्याचा प्रत्येक क्षण
फक्त तुझ्या हक्काचा...
सगळं सांगायला कशाला रे
आधार हवा शब्दांचा?
जपू दे जरा हळुवारपणा
या क्षणाला क्षणांचा
काहीच बोलू नकोस
फक्त जवळ राहा
भाव असाच समजुदे
स्पर्शाला स्पर्शाचा!!!

फ़क्त एकदा "हो" म्हण

मला खूप आवडतं जेव्हा तु मला तुझी म्हणतोस...
मी तुझ्यात हरवुन गेलोय
कायमची माझी बन सांगतोस...
इतक्या लवकर कसे हरवलो
मला खरच कळेनासं झालय...
तुझ्या माझ्या नात्याचं
गणितच वेगळं बनलय
असं मी म्हंटलं की मात्र
तुझं उत्तर लगेच तयार
प्रेमाचं गणितच नसतं
असतं बिनवेळेचं घड्याळ
त्या घड्याळाला काटेच नसतात
नसतं स्वत:चही बंधन
तिथेच फ़ुलतं तुझ्या माझ्या
स्वप्नांचं आंगण...
त्या आंगणातली सगळी स्वप्नं
तुझ्या असण्याने पूर्ण होतील
तुझ्या माझ्या नात्यांच्या
रेशिमगाठी जुळतील...
म्हणून विनवतो तुला
तू लवकर माझी बन
माहीत आहे माझीच आहेस
फ़क्त एकदा "हो" म्हण

कळल्याशिवाय राहणार नाही...

लाख विनवण्या केल्या तरी
माझं प्रेम नाही तुला उमजत
आसवांची किम्मत खरच
गळल्यशिवाय नाही कळत

सुरुवातीला वाटत होतं
तुला समजतील माझे भाव
नजरेतुनच घेशिल तु
माझ्या मुक्या शब्दांचा ठाव
तुझ्या माझ्यातलं अंतर मग
अगदीच शुल्लक ठरेल
मनामधे तुझ्या
प्रेमाची एक ज्योत तेवेल
प्रेम तुझं दिसलं मला
भावही कळले मला
अन क्शणा क्शणाला बदलणारे
तुझे वेडही उमगले मला

कशाला आता शब्दांचे खेळ मग
कशाला आता वेडी आस
पुर्ततेआधिच अपुरे राहिले
तुझ्यात गुन्तलेले माझे श्वास
तरीही मी आशा सोडली नाही
आस मनीची सुटली नाही
तुझ्या शब्दांना झेलनारी
ओंजळ माझी तुटली नाही

आज त्यात जमा आहेत
माझे वेडे अश्रु
तेही आटुन जातील
संपतील वाट पाहुन
पण थांबणार नाही क्शणभरही
माझ्या मनातलं काहूर
सुटतील बांध...
तुटतील श्वास ...
पण तुझी वाट पाहील
माझी वेडी आस....

लक्शात ठेव शब्द माझे
स्मरतील तुला एकांतपणी
लढशील कसाही
सावरशीलही....
पण एक अश्रु तुझ्या डोळ्यातुन
गळल्याशिवाय राहणार नाही
माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही...

माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही...

प्रद्न्या

पुर्वी होतं जसं...

आज माझे शब्द संपले आहेत...
मनात वादळ असलं तरी....
तुझ दु:ख किती सलतं मला
सल तुला आणि वेदना माझ्या उरी...

कोणत्या क्शणाची चूक ही...
कि कोणत्या घटनेची परिणति
कोणत्या विचाराने माझ्या सांग
अशी बोच तुला दिली...

कळेनासंच झालय...
हे काय चाललं आहे...
मनात नसुनही असं काही
माझ्याकडुन का होतंय

शंभर प्रश्न उभे समोर,
पण कशाचंच उत्तर मिळत नाही...
मनात येत असुनही मला
प्रायश्च्चित्त काही करता येत नाही...

काय करु?
तुच सांग आता
तुलाही कसं सांगायचं
उमजेना मला...

सारं काही मान्य आहे...
तुझा रोश सोडुन..
तु परत तसाच हवास...
सगळा राग विसरुन...

खरंच सांगते तुला
पुन्हा असं नाही होवु देणार...
मनातल्या विचारांचा गोंधळ
शब्दात नाही होवु देणार...

जमत असेल तर एकदा
पुन्हा विश्वास ठेवुन पहा
तुझ्या समाधानासाठी एखादी
शिक्शा करुन पहा...

सगळं काही मान्य मला
तू म्हणशील तसं...
पण तसच हवं सगळं
पुर्वी होतं जसं...

पुर्वी होतं जसं...
पुर्वी होतं जसं...